#स्पर्धापरीक्षा - 'कृषी विज्ञान केंद्र ज्ञान तंत्र' पोर्टल 

टीम ई सकाळ
रविवार, 4 जून 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 
http://sakalpublications.com वर पुस्तके उपलब्ध आहेत. 

देशातील शेती आणि शेतकऱ्यांना विज्ञानाशी जोडणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र पोर्टलचे उद्‌घाटन दि. 8 जुलै 2016 रोजी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे करण्यात आले. या पोर्टलमार्फत देशातील 645 कृषी विज्ञान केंद्रांतील कामकाजावर देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच या पोर्टलमार्फत शेतकऱ्यांना हवामान अंदाज आणि बाजारभावासंबंधी माहिती मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'कृषी विज्ञान केंद्र ज्ञान तंत्र' असे या पोर्टलचे नाव ठेवण्यात आले आहे. 

असे आहे पोर्टल : 

  • शेतकऱ्यांना हवामान अंदाज आणि बाजारासंबंधी माहिती मिळणार. 
  • देशातील 645 कृषी विज्ञान केंद्रातील उपक्रमांची अद्ययावत माहिती उपलब्ध.
  • शेतकऱ्यांना शेतीसंबंधी प्रश्‍न विचारून माहिती मिळविण्याची सुविधा. 
  • संबंधित जिल्ह्यातील कृषिसंबंधित माहिती पोर्टलवर उपलब्ध. 
  • शेतकरी, अधिकाऱ्यांना नोंदणी करून माहिती मिळविता येणार. 

भारतीय कृषी संशोधन परिषद 
'भारतीय कृषी संशोधन परिषद' ही देशातील सर्वोच्च कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यातील संस्था आहे. भारत सरकारच्या कृषी विभाग आणि कृषी संशोधन आणि शिक्षण विभागांतर्गत या संस्थेचा कारभार चालतो. 

देशातील कृषी, फलोद्यान, मत्स्यशेती, पशुपालनातील शिक्षण तसेच संशोधनाचे नियोजन करण्याचे काम परिषदेमार्फत केले जाते. 

परिषदेच्या अंतर्गत संशोधन केंद्र आणि कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन, तंत्रज्ञान विस्तारामुळे भारतीय शेतीला नवी दिशा मिळाली असून संशोधन संस्थांनी विकसित केलेले विविध वाण, पीक व्यवस्थापनाचे तंत्र, पशुपालन, मत्स्यशेती, कुक्कुटपालन प्रक्रिया उद्योगातील तंत्र शेतकऱ्यापर्यंत पोहचत आहे. 

परिषदेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून या परिषदेच्या अंतर्गत 99 संशोधन संस्था आणि 53 कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा -

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार

#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान

#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना

#स्पर्धापरीक्षा - अलिप्ततावादी चळवळीविषयी

#स्पर्धापरीक्षा - रिओ ऑलिंपिक स्पर्धा 2016

#स्पर्धापरीक्षा - गुगल प्रोजेक्ट लून

#स्पर्धापरीक्षा -'स्टॅंड अप इंडिया' योजना

#स्पर्धापरीक्षा - बौद्धिक संपदा हक्क धोरण

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal news esakal news competitive exam news series upsc mpsc KVK Portal