सबबी सांगू नका, काम करा - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

मुंबई - राज्यभरात एक मे पासून डिजिटल सातबारा देण्याची योजना जाहीर झालेली असतानाही सध्या अनेक जिल्ह्यांत सातबारा मिळत नसल्याच्या "दै. सकाळ'मधील वृत्ताची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. आज मंत्रालयात जमाबंदी आयुक्‍तांसह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. ""मला सबबी सांगू नका, काम करा,'' अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारले 

राज्यभरासाठी योजना सुरू केलेली असताना सातबारा डिजिटल करण्यासाठी का वेळ लागतोय? जनतेसाठी योजना जाहीर करतानाच सर्व तांत्रिक बाबी तपासता येत नाहीत काय? अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. सध्या चाळीस लाख सातबारा डिजिटल झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मात्र, "सव्हर्र व "क्‍लाउड स्टोअरेज'च्या तांत्रिक अडचणी आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी देण्याचा प्रयत्न केला. त्यावर, अधिकाऱ्यांवर विश्‍वास ठेवून सरकार जनतेसाठी धोरणात्मक निर्णय घेते, त्यामुळे कारणं कसली देता? या सर्व बाबी परिपूर्ण असल्याशिवाय धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकत नाही याची जाणीव नाही काय? असा संताप व्यक्‍त करत, तातडीने सर्वच्या सर्व साडेसहा कोटी सातबारा डिजिटल स्वाक्षरीने परिपूर्ण करण्यासाठी झोकून देऊन काम करा, मला कोणत्याही सबबी सांगू नका, असे मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले. 

Web Title: sakal news impact Do not let excuses get to work says devendra fadnavis