Premium|सकाळ+ तर्फे विद्यार्थ्यांना मोफत करियर मार्गदर्शन; प्रा.दुर्गेश मंगेशकर यांचे २० जून रोजी ऑनलाईन वेबिनार

Career counselling for students: इयत्ता दहावी, बारावी व पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडीचे मार्गदर्शन; प्रा. दुर्गेश मंगेशकर २० जूनला ऑनलाईन वेबिनारमधून विविध क्षेत्रांतील संधींचा वेध घेणार
saka+ webinar

saka+ webinar

Esakal

Updated on

Sakal+ free online webinar for student

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनमुळे आज जगभरातील नोकऱ्यांचे आणि करिअरचे स्वरूप पूर्णपणे बदलत आहे. अनेक पारंपरिक करिअर पर्याय कालबाह्य होत असताना, नवनवीन क्षेत्रांची दारे खुली होत आहेत. अशा या आव्हानात्मक आणि गतिमान युगात विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती करिअर दिशा निवडावी, भविष्यासाठी स्वतःला कसे तयार करावे, तसेच जेईई, जेईई अडवान्स, नीट, सीईटी, टीईटी यांसारख्या परीक्षा नेमक्या काय असतात, त्या कशासाठी असतात, यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांची तयारी करून देशातील सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश कसा मिळवावा, या विषयावर सकाळ+ तर्फे एका विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हे वेबिनार शनिवार, २० जून रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आले असून हे सर्वासाठी मोफत असणार आहे.

करिअर कौन्सिलर प्रा. दुर्गेश मंगेशकर हे या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

वेबिनारमधील मुख्य मार्गदर्शनाचे मुद्दे:

१. AI चे युग आणि भविष्यातील करिअर

AI मुळे कोणत्या क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांच्या संधी वाढणार आहेत आणि कोणत्या क्षेत्रांना फटका बसू शकतो, याचे विश्लेषण. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवण्यावर भर न देता, भविष्याची गरज ओळखून कोणती नवनवीन कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत, यावर प्रा. मंगेशकर माहिती देतील.

२. JEE परीक्षेची अचूक रणनीती :

आयआयटी (IIT), एनआयटी (NIT) आणि ट्रिपल आयटी (IIIT) यांसारख्या देशातील अग्रगण्य संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या 'JEE' (Main & Advanced) परीक्षेची तयारी कशी करावी? यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत याविषयी ते मार्गदर्शन करतील

३. 'राइट कॉलेज' आणि 'राइट ब्रँच'ची निवड कशी करावी?

अनेकदा विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही केवळ चुकीचे कॉलेज किंवा चुकीची शाखा निवडल्यामुळे त्यांच्या करिअरचे नुकसान होते. कॉलेजची पायाभूत सुविधा, प्लेसमेंट रेकॉर्ड, फॅकल्टी आणि भविष्यातील स्कोप लक्षात घेऊन योग्य कॉलेजची निवड कशी करावी, याविषयी देखील मंगेशकरसर या वेबिनारमध्ये माहिती देतील.

saka+ webinar
Education News : सकाळ स्टडी रूम आणि ज्ञानदीप अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

प्रा. दुर्गेश मंगेशकर हे स्वत: आयआयटीचे विद्यार्थी राहिले असून गेल्या अनेक वर्षांपासून आयआयटी आणि इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षांच्या क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवला आहे. बदलत्या शैक्षणिक धोरणांचा आणि जागतिक तंत्रज्ञानाचा त्यांचा अभ्यास आहे.

वेबिनार तपशील:

विषय: AI च्या युगात विद्यार्थ्यांनी कोणती करिअर दिशा निवडावी? (सह-मार्गदर्शन: JEE ची तयारी आणि कॉलेज निवड)

प्रमुख वक्ते: प्रा. दुर्गेश मंगेशकर (शिक्षणतज्ज्ञ)

दिनांक: २० जून

वेळ: सकाळी ११:०० वाजता

माध्यम: ऑनलाईन (वेबिनार)

वेबिनारची लिंक : https://us02web.zoom.us/webinar/register/WN_pOo-Cqu1QV2xKv1PEUVgow

इयत्ता १० वी, ११ वी आणि १२ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हा वेबिनार अत्यंत दिशादर्शक ठरू शकतो. हा पुर्णपणे मोफत आहे. भविष्यातील करिअरची चिंता मिटवण्यासाठी आणि वेळेत योग्य निर्णय घेण्यासाठी या मोफत वेबिनारमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सकाळ+ टीमकडून करण्यात आले आहे.

------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com