Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी जनतेची पसंती कोणाला? सुप्रिया सुळे, अजित पवार की…

Sakal-Saam Survey next NCP chief after Sharad Pawar resignation Supriya sule Ajit pawar praful patel
Sakal-Saam Survey next NCP chief after Sharad Pawar resignation Supriya sule Ajit pawar praful patel

Sharad Pawar Resigns

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केलं. यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात एकच गोंधळ सुरु झाला. यापार्श्वभूमिवर सकाळ-साम टीव्हीनं सर्व्हे केला असून लोकांना याबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. Sakal Saam TV Survey

या सर्व्हेमध्ये लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल? असा थेट प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला लोकांनी उत्तर दिलं आहे.

सर्व्हेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल? या प्रश्नावर ७,७३३ नागरिकांनी मत दिलं आहे. सर्वपक्षीय समर्थकांनी दिलेल्या या कलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्यातील नेतृत्व म्हणून अनेकांनी सुप्रिया सुळे (३५.२१%) यांना पसंती दिली आहे. तर त्याखालोखाल चर्चेत असलेलं नाव म्हणजे अजित पवार (३२. ११७) यांना पसंती मिळाल्याचे दिसते.

Sakal-Saam Survey next NCP chief after Sharad Pawar resignation Supriya sule Ajit pawar praful patel
Sakal - Saam Survey : पवारांनी दिलेला राजीनामा योग्य की अयोग्य; तुम्हाला काय वाटतं?

मात्र, एकंदरीत सर्व्हे पाहिला तर शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचं अध्यक्षपद हे पवार कुटूंबाबाहेरील सदस्यांना मिळावं याबद्दल फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. अजित पवारांना ३२.१ टक्के तर सुप्रिया सुळेंना ३५.२ टक्के मतदारांची पसंती मिळाली मात्र इतर पाच जणांना अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

या सर्व्हेदरम्यान राष्ट्रवादीचं नेतृत्वाचे प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील असे पर्याय देखील देण्यात आले होते. यामध्ये सुप्रिया सुळे यांना लोकांनी पहिली पसंती दिली आहे.

Sakal-Saam Survey next NCP chief after Sharad Pawar resignation Supriya sule Ajit pawar praful patel
Sakal-Saam TV Survey: अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी मविआमधून बाहेर पडतील? BJP त्यांना संधी देईल?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com