Sakal Survey : २०२४मध्येही मोदींवर भरोसा!, 'पवारांनी पावसात भिजण्याचं ढोंग केलं तरी...' राम कदमांचा हल्ला

Sakal Survey
Sakal Surveyesakal

Sakal-Saam Survey on 9 years Modi Government : केंद्रातल्या मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'सकाळ-साम'च्या वतीने महाराष्ट्रातील मतदारांचा सर्वे करण्यात आला. या सर्वेमधून लोकांच्या मनातील सरकारविषयीच्या भावना स्पष्ट झाल्या आहेत.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत आपण २०१९प्रमाणेच मतदान करणार का? या पश्नावर ४८.३ टक्के लोकांनी होय, २०१९प्रमाणेच मतदान करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर ३३.३ टक्के लोकांनी नाही म्हटलं आहे. तर १८.४ टक्के लोकांनी सांगता येत नाही, असं नमूद केलं.

Sakal Survey
Sakal Saam Survey: शिंदे की उद्धव ठाकरे ? मराठी जनता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणता चमत्कार दाखवणार ?

४८.३ टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने मत मांडल्याने भाजपचे राम कदम यांनी भूमिका मांडली आहे. 'साम टीव्ही'वर बोलतांना ते म्हणाले की, जी प्रगत राष्ट्र आहेत, अमेरिका, इंग्लंड येथे कोविडमुळे कंबरडलं मोडलं आहे. तुलनात्मकदृष्ट्या भारत पुढे आहे. बरंच काम मोदींनी केलं आहे आणि पुढेही करायचं आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे. ४ लाख किलोमीटरचे रस्त्याचं काम सुरु आहे.

कदम पुढे म्हणाले की, 'सकाळ-साम'ने केलेला सर्वे हेच सांगतो की, २०२४ला कितीही आदळाआपट केली आणि शरद पवारांनी पावसात कितीही भिजण्याचं सोंग केलं तरी सरकार भाजपचंच येणार आहे. असं म्हणत त्यांनी थेट पवारांवर टीका केली आहे.

महाराष्ट्रातले २८८ विधानसभा मतदारसंघ आणि ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये हा सर्वे करण्यात आला. महाराष्ट्रातील मतदार केंद्र सरकारकडे कसं पाहतात, मोदींनी घेतलेल्या निर्णयांचा काय परिणाम झाला आणि एकूणच केंद्राची काय प्रतिमा आहे; याचं मतदारांच्या मनातील प्रतिबिंब यातून समोर आलेलं आहे.

मोदी सरकारचे ९ वर्षातील सर्वात मोठे अपयश कोणते?

केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झालेली आहे. या ९ वर्षांमध्ये केंद्राने अनेक योजना आणल्या, काही धाडसी निर्णय घेतले तर काही जुन्या योजना नव्याने राबवल्या. मात्र या ९ वर्षांमध्ये मोदी सरकारचं अपयश कोणतं? असं मतदारांना विचारण्यात आलं. 'महागाई' हाच मुद्दा मतदारांनी उचलून धरला. महागाई रोखण्यात मोदींना अपयश आल्याचं ३९.३ टक्के लोकांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com