Sakal Saam Survey : मोदींचं सर्वात मोठं अपयश कोणतं? महागाई, बेरोजगारी की नोटबंदी? महाराष्ट्रातील मतदार म्हणतात...

Sakal Survey
Sakal Surveyesakal

Sakal Surve on Narendra Modi Government : नरेंद्र मोदी सरकारला आता नऊ वर्षे पूर्ण झालेली आहेत. पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका लागतील. मोदी सरकाकरविषयी सामान्यांच्या मनात काय भावना आहेत, याचा कानोसा सकाळ माध्यम समूहाच्या वतीने घेण्यात आला. 'सकाळ-साम'च्या वतीने महाराष्ट्रातील मतदारांचा सर्वे केला असून त्यातून लोकभावनेचा अंदाज समोर आलेला आहे.

महाराष्ट्रातले २८८ विधानसभा मतदारसंघ आणि ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये हा सर्वे करण्यात आला. महाराष्ट्रातील मतदार केंद्र सरकारकडे कसं पाहतात, मोदींनी घेतलेल्या निर्णयांचा काय परिणाम झाला आणि एकूणच केंद्राची काय प्रतिमा आहे; याचं मतदारांच्या मनातील प्रतिबिंब यातून समोर आलेलं आहे.

Sakal Survey
गोफण| तुमची 'केरळ स्टोरी' वेगळी आमची वेगळी...

मोदी सरकारचे ९ वर्षातील सर्वात मोठे अपयश कोणते?

केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झालेली आहे. या ९ वर्षांमध्ये केंद्राने अनेक योजना आणल्या, काही धाडसी निर्णय घेतले तर काही जुन्या योजना नव्याने राबवल्या. मात्र या ९ वर्षांमध्ये मोदी सरकारचं अपयश कोणतं? असं मतदारांना विचारण्यात आलं. 'महागाई' हाच मुद्दा मतदारांनी उचलून धरला. महागाई रोखण्यात मोदींना अपयश आल्याचं ३९.३ टक्के लोकांनी सांगितलं.

महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ; किती टक्के लोकांना कोणतं अपयश वाटलं?

  • महागाई: 39.3%

  • बेरोजगारी: 18.6%

  • इंधन दरवाढ: 12%

  • सीमा सुरक्षा: 2.6%

  • नोटबंदी: 6.6%

  • कोरोना काळातील नियोजन: 2.3%

  • अपयशी ठरले असे वाटत नाही: 11.5%

  • सांगता येत नाही: 7%

असं झालं महासर्वेक्षण!

'सकाळ'च्या दोन हजारांवर सहकाऱ्यांनी हे सर्वेक्षण पूर्णत्वास नेले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४९ हजार २३१ लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून सर्वे करण्यात आला. मतदारांचा कल समजून घेण्याचा सकाळने प्रयत्न केला आहे. त्यातून मतदारांच्या मनात मोदी सरकारविषयी काय भावना आहेत, याचा अंदाज येण्यात मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com