#SakalForMaharashtra आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांसाठी रोजगार निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

पुणे : मुंबई - महाराष्ट्रातील सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, समाजानेच एकत्र येऊन समस्यांवर मार्ग शोधण्याच्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रांतील यशस्वी मान्यवर व सामाजिक संस्थांनी ‘सकाळ’च्या अभियानात शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना मदत, तरुणांमधील कौशल्यविकास, तसेच महिलांची आर्थिक सुरक्षा, एकूणच समाजाच्या उभारणीसाठी पैसा, वेळ, तसेच उद्योजकता-व्यावसायिकतेचा कानमंत्र देण्याची तयारी दर्शविली आहे. #SakalForMaharashtra

पुणे : मुंबई - महाराष्ट्रातील सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, समाजानेच एकत्र येऊन समस्यांवर मार्ग शोधण्याच्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रांतील यशस्वी मान्यवर व सामाजिक संस्थांनी ‘सकाळ’च्या अभियानात शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना मदत, तरुणांमधील कौशल्यविकास, तसेच महिलांची आर्थिक सुरक्षा, एकूणच समाजाच्या उभारणीसाठी पैसा, वेळ, तसेच उद्योजकता-व्यावसायिकतेचा कानमंत्र देण्याची तयारी दर्शविली आहे. #SakalForMaharashtra

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांसाठी रोजगार निर्मिती
मी चार्टर्ड अकांऊटंट (सीए) आहे. आणि 'सकाळ'च्या उपक्रमात सहभागी होण्यास नक्की आनंद होईल. मागील 40 वर्षापासून कॉमर्स क्षेत्रात काम करण्याचा अनूभव आहे. या कामाच्या अनूभवातून कॉमर्स विषयाशी संबंधीत अकांऊट, फायनान्स, बेसीक टॅक्स लॉ आदीचे प्रशिक्षण विशेषता आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांसाठी घेऊ शकतो. हे करत असताना कोणत्याही प्रकारचे राजकीय हेवेदावे यामध्ये असणार नाहीत. केवळ नि:स्वार्थी, प्रामाणिकपणे, पारदर्शक, समर्पण आणि भक्तीच्या भावनेतून हे काम करू शकतो. या प्रशिक्षणानंतर स्वयंरोजगाराचा एक समूह तयार होईल, जो इतरांसाठीही रोजगार निर्माण करू शकेल.
- प्रा. सुरेश मेहता, चार्टर्ड अकांऊटंट(सीए) पुणे.

उद्योजकतेविषयी समाजातील तरुणांना मार्गदर्शनाची गरज
शेतीत उत्पन्न नाही, शिक्षण महागले आणि शिकले तरी हाताला रोजगार नाही यामुळे समजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत 'सकाळ'ने सर्वांनी एकत्र येवुन विद्यमान परिस्थितीतुन मार्ग काढण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम खूप चांगला आहे. समाज म्हणुन या परिस्थितीतुन शेतकरी, तरुणांना बाहेर काढण्याची गरज आहे. त्यांच्या हाताला काम मिळाले पाहीजे. त्यांना कौशल्यविषयक शिक्षण दिले तर रोजगार मिळेल. पोटापाण्याचा प्रश्‍न काही अंशी सुटेल. आपल्या ओळखीच्या उद्योजकांशी बोलून त्यांच्या उद्योगामध्ये काही जणांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देता येईल. उद्योजकतेविषयी समाजातील तरुणांना मदत व मार्गदर्शन करावे लागणार आहे या तिन्ही बाबींसाठी माझ्यातर्फे सर्व प्रकारची मदत व मार्गदर्शन करण्याची तयारी आहे. 
- बी. एस. खोसे, उद्योजक, संस्थापक अध्यक्ष एनईसीसी, औरंगाबाद

शिक्षणाचा दर्जा कमालीचा घसरला
सर्वांसाठी शिक्षण आहेच पण त्याचा दर्जा कमालीचा घसरलेला आहे. त्यावर लक्ष केंद्रीत व्हावे. आरोग्याच्या सेवा हव्यात. इस्त्रायलमध्ये श्रीमंत व्यक्ती हा शेतकरी आहे. पण आपल्या देशात उलट परिस्थती आहे. यावर उपाय करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींची, संस्थेची गरज आहे. चीन हा प्रयोग राबवित आहेत. प्रोफेशनल्सला आपण केवळ एक्‍स्पर्ट म्हणतो, त्यांची प्रत्यक्ष मदत घ्यावी लागणार आहे. इस्त्राइमध्ये शेतकरी वाण लावतो तेव्हा त्या वाणाची जागतिक बाजारपेठेत नोंदणी होते. लकीश मोशाव या भागात द्राक्ष उत्पादन सर्वात जास्त होते. तेथे उत्पादनाआधीच जागतिक भाव ठरतोव मागणीही असते. या उलट आपल्या देशात उत्पादनानंतरच भाव ठरतो. 

- रमेश देशमूख, उपाध्यक्ष, म्यून्सिपल इंजिनिअर असोसिएशन, मुंबई.

गटशेतीला प्राधान्य द्यावे लागेल
गटशेतीला प्राधान्य देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. यातून एकत्र येत शेती करणे, अन्नप्रक्रिया उद्योग, निर्यात करणे याकडे कल असायला हवा. शंभर टक्के गटशेती केल्यास स्वयंरोजगार वाढतील. तरुणांना योग्य वेळी, योग्य मार्गदर्शन मिळाले तर कोणत्याही उद्योगात यश मिळते. वैयक्तिकरित्या मी महिन्यातून केव्हीही कोणत्याही उद्योगआधारित कौशल्यावर मार्गदर्शन करु शकेल. 'सकाळ'सोबत या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल.

- शिवाजीराव काटकर, सातारा

Web Title: SakalForMaharashtra Employment generation for economically backward youth