
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणात रोज नवनवीन घडामो़डी घडत आहेत. नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणात अनेक नवीन नावं समोर आली आहे. एनसीबीच्या कारवाईतील पंच किरण गोसावीवर नवाब मलिकांनी गंभीर आरोप केले होते. त्याच्याच संपर्कात असलेल्या सॅम डिसूझावर (Sam D'souza) देखील गंभीर आरोप होते. त्यावरून आता सॅम डिसूझाने कोर्टात धाव घेतली आहे.
कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कोट्यावधी रुपयाच्या पैशांचा व्यवहार झाल्याचा गौप्य स्फोट प्रभाकर साहिल याने केला होता. या व्यवहारात प्रभाकरने सॅम डिसोझाला ३८ लाख रुपये पोहोचवले होते. याच प्रकरणात अटक टाळण्यासाठी सॅम डिसोझाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात NCBची विझिलन्स टिम व मुंबई पोलिसा़ंचे विशेष पथक तपास करत आहे.
दरम्यान, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं झालं असून, या प्रकरणात रोज नवीन नावं समोर येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत अजून कोणत्या गोष्टींचा उलगडा होतो हे पाहावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.