esakal | फक्त औपचारिकता बाकी आहे जयघोषाची...

बोलून बातमी शोधा

Preparations for victory by NCp and BJP Party Workers in Pandharpur
फक्त औपचारिकता बाकी आहे जयघोषाची...
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाच्या पाेटनिवडणुकीची मतमाेजणी सुरु आहे. सतराव्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांनी मतांची आघाडी कायम ठेवली आहे. त्यांना 55 हजार 559 मते तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 54 हजार 664 मते मिळाली आहेत. समाधान आवताडे हे सध्या 895 मतांनी आघाडीवर आहेत. दरम्यान मतमाेजणीत आवाताडे यांनी आघाडी घेतल्यानंतर साेशल मिडीयावर आवातडेंच्या समर्थकांनी फक्त औपचारिकता बाकी आहे जयघोषाची... अशा स्वरुपाच्या पाेस्ट व्हायरल करण्यास प्रारंभ केला आहे.

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस आज (रविवारी) सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. साधरणतः दहाव्या फेरीनंतर आवाताडे यांनी भालके यांच्यावर थाेड्या थाेड्या मतांनी आघाडी घेतली. ही आघाडी 22 फेरी अखेर पर्यंत राखली आहे. दरम्यान 19 व्या फेरी अखेर आवाताडेंना 55 हजार 559 मते तसेच भालके यांना 54664 इतके मते मिळाली आहेत.

आवाताडे यांच्या समर्थकांनी साेशल मिडियावर त्यांचे छायाचित्रासाेबत विजयाची खूण असलेल्या पाेस्ट व्हायरल करण्यास प्रारंभ केला आहे. याबराेबरच एकटा टायगर... पंढरपूरमध्ये भाजपाचे समाधान आवताडे भकास तिघाडीला भारी पडतायत अशा प्रकारच्या पाेस्टही फिरत आहेत. एकच वादा समाधान दादा , दादांचा विजय निश्चित अशाही स्वरुपाच्या पाेस्ट फिरत आहेत.

Video पाहा : आम्हीच जिंकू; चंद्रकांतदादांनी सरकार कसं पडेल तेही सांगून टाकलं

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांना गुलाल उधळायला व जल्लोष करायला बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राकडे कोणालाही फिरकायला परवानगी नाही. मतमोजणी केंद्रात कोव्हिड टेस्ट केलेला रिपोर्ट असेल व केंद्रात प्रवेशाची परवानगी घेतलेली असेल तरच प्रवेश दिला जात आहे.

मंगळवेढा संपूर्ण तालुका तर पंढरपूर तालुक्‍यातील 35 गावे आणि पंढरपूर शहर असा पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भगीरथ भालके महाविकास आघाडीकडून तर भाजपच्या वतीने समाधान आवताडे रिंगणात होते. शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल ही आशा फोल ठरल्यानंतर शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी बंडखोरी करून या निवडणुकीत उडी घेतली.