
वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर संभाजी भिडे आक्रमक
सांगली : राज्य सरकारने सुपरमार्केट (Super Market) आणि वॉक-इन स्टोअरमध्ये वाईन (Wine) विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर गुरवारला मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलाय. मात्र या निर्णयावर भाजपसह अनेकांनी विरोध दर्शवलाय. यातच या निर्णयावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे आक्रमक झाले आहेत.
राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, समाज आणि राष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे. संपूर्ण मंत्रिमंडळाने संभाजी महाराजांच्या पायाशी नतमस्तक होऊन माफी मागावी अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे. सोबत हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा उद्रेक अटळ आहे, असा इशारा सुध्दा भिडे यांनी दिलाय.
हेही वाचा: निलंबनाचा वाद चिघळणार? SC च्या निर्णयावर जाधवांचं मोठं विधान
राज्य सरकारचा या निर्णयाविरोधात संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र सरकारने दुकाने आणि मॉलमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी असून नितीमत्तेचा संहार करणारा आहे, असं मत भिडे यांनी निवेदनातून व्यक्त केलंय. राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेत हा निर्णय मागे घ्यावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असे भिडे म्हणाले.
Web Title: Sambhaji Bhide Aggressive On Decision To Allow Sale Of Wine
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..