भिडेंसोबतच्या बहुजनांनो आता तरी विचार करा..! - छगन भुजबळ

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 जुलै 2018

नागपूर - संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम हे मनुपेक्षा श्रेष्ठ होते. त्यामुळे ज्ञानोबा-तुकाराम यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ आहे, असा दावा करणाऱ्या व मनुवादाचे समर्थन करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यासोबत असणाऱ्या बहुजनांनी आता तरी विचार करावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

तब्बल दोन वर्षांनंतर नागपुरात पाऊल टाकलेल्या छगन भुजबळ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर एकच गर्दी केली होती. "छगन भुजबळ आगे बढो, हम तुम्हारे साथ है'च्या घोषणांनी आसंमत दुमदुमला होता. या वेळी भुजबळ यांच्या डोक्‍यावर "फुले पगडी' होती.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात गैरव्यवहार केल्याच्या आरोपामुळे छगन भुजबळांना अटक करण्यात आली होती. तब्बल दोन वर्षांनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते रविवारी नागपुरात आले. या वेळी त्यांच्या चाहत्यांनी विमानतळावर गर्दी केली होती. नागपूर व विदर्भातून महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते नागपुरात पोहोचले होते. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर छगन भुजबळ यांनी विमानतळ परिसरातच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी बोलताना त्यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्ञानेश्‍वर व तुकारामापेक्षा मनुला श्रेष्ठ मानणाऱ्या संभाजी भिडेसोबत असणाऱ्या बहुजनांनी विचार करावा. मनुने केवळ 3 टक्के लोकांचे भले केले आहे. ज्ञानोबा-तुकाराम हे राज्यातील 97 टक्के जनतेचे श्रद्धास्थान असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Sambhaji Bhide Chagan Bhujbal Politics