Sambhaji Bhide : भिडेंची आतापर्यंतची वादग्रस्त विधानं कोणती?

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात.
Sambhaji Bhide
Sambhaji Bhide Sakal

Sambhaji Bhide Controversial Statement : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असतात. आजदेखील त्यांनी एका महिला पत्रकाराला उद्देशून केलेल्या विधानामुळे नवा वाद सुरू झाला आहे.

Sambhaji Bhide
Google News : Google ने कायमची बंद केली 'ही' सेवा; आताच डाऊनलोड करा महत्त्वाचा डाटा

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्यानंतर भिडे यांच्याशी एका महिला पत्रकारानं संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलेनं अशा शब्दांत भिडे यांनी बोलण्यास नकार दिला. पण भिडेंचं हे विधान हे एका महिलेचा अपमान असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. आज आम्ही भिडे यांनी आतापर्यंत केलेली वादग्रस्त विधानं कोणती याबद्दल सांगणार आहोत.

Sambhaji Bhide
Badshah Masala : कधी काळी सिगारटेच्या डब्ब्यात विकला जात होता प्रसिद्ध मसाला

काही दिवसांपूर्वी भिडे यांनी स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे. असं अत्यंत वादग्रस्त विधान केले होते. सांगलीमध्ये दुर्गामाता दौडीच्या समारोप प्रसंगी त्यांनी हे वादग्रस्त विधान केले होते.

'निर्लज्ज लोकांचं देश म्हणजे हिंदुस्थान'

'जगाच्या पाठीवर 187 राष्ट्र आहे. या राष्ट्रात आपल्याला गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा विषमपणा वाटत नाही, लाज वाटत नाही.. अशा बेशरम लोकांचा... जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश असेदेखील वादग्रस्त विधान भिडे यांनी यापूर्वी केले आहे. निर्लज्ज लोकांमध्ये चीन आघाडीवर असून, परकियांचे दास्यत्व करत, परकियांचे खरकटं-उष्टं खात.. स्वाभिमानाची शून्य जाणीव नसलेला निर्लज्ज लोकांचा देश ज्याचे नाव हिंदुस्थान असल्याचेही भिडे म्हणाले होते.

Sambhaji Bhide
नेहमी गोंधळात टाकणाऱ्या बार, क्लब, पब आणि लाउंजमधील नेमका फरक काय?

कोरोनाबाबत केले होते वादग्रस्त विधान

काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनाबाबत बोलताना देखील वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, 'कोरोनाने जी माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. दारुची दुकानं उघडायला परवानगी आणि कुठे काही रस्त्यावर विकतोय त्याला पोलीस काठ्या मारत आहे. काय चावटपणा चाललाय? हा सर्व प्रकार महानालायकपणाचा आहे.

या सर्व विरोधात लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. तसेच कोरोना हा रोगच नाहीए. हा गां*** वृत्तीच्या लोकांना होणारा मानसिक रोग आहे. काही-काही होत नाही, असे विधान भिडे यांनी कोरोना काळात केले होते.

Sambhaji Bhide
Playing Card : पत्त्यांच्या कॅटमधील एकाच बादशाहने का केली शेव्हिंग? जाणून घ्या, कहाणी

'माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली'

वरील विधानांसोबतच भिडे यांनी मुलांबाबतही वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी भिडे म्हणाले होते की, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे आहे. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना हे आंबे खायला दिलेत. पथ्य सांगितले आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली.

Sambhaji Bhide
Sambhaji Bhide : आधी टिकली लाव, मगच मी बोलेन! संभाजी भिडे हे काय बडबडले?

ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. अशाप्रकारचे वादग्रस्त विधान भिडे यांनी 2018 साली केले होते. ज्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com