esakal | 'बहुजन समाजाला न्याय मिळतो तोच मराठा समाजाला मिळावा'
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhaji Raje

'बहुजन समाजाला न्याय मिळतो तोच मराठा समाजाला मिळावा'

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर (maratha reservation) स्थगिती आल्यापासून राज्यात मराठा समाजात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी काय करता येईल, समाजाचे काय मत आहे यासाठी खासदार संभाजीराजे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. 'जो बहुजन समाजाला न्याय मिळतो तोच मराठा समाजाला मिळावा, अशी मागणी संभाजेराजेंनी (Sambhaji Raje) औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलताना केली.

'मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री, शरद पवार आणि विरोधी पक्षनेत्यांना भेटणार आहे. २७ मेऐवजी २८ तारखेला भूमिका स्पष्ट करणार. तसेच मराठा समाजाला न्याय मिळवून देणं हीच आमची भूमिका आहे आणि वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावरही उतरू अशी भूमिका पत्रकार परिषदेत संभाजीराजेंनी मांडली.

हेही वाचा: PM CARES Fund: 'व्हेंटिलेटर्सला राजकीय रंग देऊ नका'

पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, सरकारने दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरावं लागेल, पण ही आंदोलनाची वेळ नाही. ७० टक्के समाज गरीब आहे, त्यांच्यासाठी काय करणार हे सरकारनं सांगावं. तसेच मराठा समाजाच्या मुद्द्यांना राजकीय रंग देऊ नका, असे आवाहनही राजेंनी केलं आहे.