Khashaba Jadhav : आता तरी सरकारने जागं व्हावे… ; संभाजीराजेंचं खाशाबा जाधवांसाठी उद्विग्न ट्विट

sambhaji raje tweet over khashaba jadhav google doodle demand padma award for wrestler
sambhaji raje tweet over khashaba jadhav google doodle demand padma award for wrestler

Sambhaji Raje on khashaba jadhav google doodle : भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. या गुगलने डुडल तयार करत त्यांना मानवंदना दिली आहे. यादरम्यान छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करत खशाबा जाधव यांच्याकडे सरकारने केलेल्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, "गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही! १९५२ साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. या निमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे!"

sambhaji raje tweet over khashaba jadhav google doodle demand padma award for wrestler
Nagpur News : संक्रांत कडू झाली! बापासमोरचं पोटच्या लेकराचा दुर्दैवी अंत; माजांने घेतला बळी

"देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या खेळाडूस सरकारकडून "पद्म" पुरस्काराने सन्मानित केले जाते. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. मात्र ज्यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले ते पैलवान खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत."

"मी खासदार असताना २०१७ ते २०२२ अशी सहा वर्षे सलग, खाशाबांना मरणोत्तर "पद्मविभूषण" मिळावा, यासाठी केंद्रात सर्व पातळीवर वारंवार पाठपुरावा केला, मात्र शेवटी उपेक्षाच झाली." असेही संभाजीराजे म्हणाले आहेत.

Khashaba jadhav google doodle
Khashaba jadhav google doodle
sambhaji raje tweet over khashaba jadhav google doodle demand padma award for wrestler
Maharashtra Politics : "तिळगुळ घ्या आणि…"; मकर संक्रांतीनिमीत्त आदित्य ठाकरेंच्या शिंदे सरकारला शुभेच्छा अन् टोमणे

आता तरी जागे व्हावे...

संभाजीराजे पुढे म्हणाले की, "आता तरी सरकारने जागे व्हावे. या महान मल्लावर ऑलिम्पिकच्या मैदानातही अन्याय झाला होता, तरीदेखील देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिद्दीने जिंकून आणणाऱ्या खाशाबा जाधव यांना "पद्म" पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल..."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com