संभाजीराजे संतापले: रायगडावर ‘मदार मोर्चा’ वर चादर घालून प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न

रायगडावरील बेकायदेशीर बांधकामासंदर्भात आक्षेप ; संभाजीराजे
MP Sambhaji Raje
MP Sambhaji RajeEsakal

कोल्हापूर: दुर्गराज रायगडावरील (Durgaraj Raigad) ‘मदार मोर्चा’ (Madar Morcha)येथे घडत असलेल्या प्रकाराबद्दल राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Sambhaji Raje)यांनी आज पुरातत्व विभागास पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी रायगडावरील बेकायदेशीर बांधकामासंदर्भात आक्षेप घेत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी किल्ले रायगड येथील 'मदार मोर्चा' या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी रंगरंगोटी करून चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती येथील शिवभक्तांनी संभाजीराजे यांनी दिली होती.

MP Sambhaji Raje
गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कर्नाटक सरकारची नवी नियमावली

ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असताना, किल्ले रायगड सारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे. किल्ले रायगडचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहावे यासाठी मदार मोर्चा याठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तात्काळ पायबंद घालण्यात यावा.अशी मागणी पुरातत्वव विभागाकडे संभाजीराजे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com