पाच टक्के जागा जिंकणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांना समान चिन्ह 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लगतच्या मागील निवडणुकीत किमान पाच टक्के जागा जिंकणाऱ्या नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या सर्व उमेदवारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात एक समान चिन्ह देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. 

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लगतच्या मागील निवडणुकीत किमान पाच टक्के जागा जिंकणाऱ्या नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या सर्व उमेदवारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात एक समान चिन्ह देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. 

भारत निवडणूक आयोगाकडील मान्यताप्राप्त पक्षांना निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी राखीव केलेले चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही आरक्षित केले जाते. राज्य निवडणूक आयोगाकडील इतर नोंदणीकृत पक्षांना (निवडणूक आयोगाची मान्यता नसलेले) मुक्त चिन्हांमधून एक चिन्ह निवडण्यासाठी प्राधान्य दिले जाते; परंतु एकापेक्षा जास्त नोंदणीकृत पक्षांनी एका जागेसाठी एकाच समान चिन्हाची मागणी केल्यास लॉटरीद्वारे चिन्हवाटप केले जाते. त्यामुळे एकाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकाच पक्षाच्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागते. यात दुरुस्ती करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती. 

यासाठी प्रचलित कायद्यात बदल करण्यात आला आहे. नोंदणीकृत राजकीय पक्षाने एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लगतच्या मागील निवडणुकीत एकूण जागांपैकी किमान पाच टक्के जागा जिंकल्या असल्यास त्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुक्त चिन्हांपैकी तात्पुरत्या स्वरूपात एक समान चिन्ह देण्याची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण सदस्य संख्येच्या पाच टक्के जागा या एकापेक्षा कमी येत असल्यास किमान एक जागा तरी जिंकलेली असणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर एखादा सदस्य संबंधित पक्षाचा केवळ आज रोजी सदस्य आहे म्हणून त्याचा निवडून आलेल्या पाच टक्के सदस्यांत समावेश होणार नाही.

Web Title: The same token the party won five seats per cent