जामिनासाठी समीर भुजबळ उच्च न्यायालयात 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 मे 2018

मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले माजी खासदार समीर भुजबळ यांनी सोमवारी सुटीकालीन उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावरील सुनावणी बुधवारी (ता. 9) होणार आहे. 

मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले माजी खासदार समीर भुजबळ यांनी सोमवारी सुटीकालीन उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावरील सुनावणी बुधवारी (ता. 9) होणार आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 4) या प्रकरणातील आरोपी छगन भुजबळ यांना ज्या निकषांवर जामीन मंजूर केला; तसेच सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलएम (लॉण्डरिंग) कायद्यातील कलम 45 (1) नुकतेच रद्द केले आहे, त्याचा विचार करून समीर यांनाही जामीन मंजूर करावा, असा अर्ज ऍड. सक्‍सेना यांनी सोमवारी न्या. भारती डांगरे यांच्यासमोर सादर केला. या अर्जासोबत छगन भुजबळ यांना दिलेल्या जामिनाच्या निर्णयाची प्रत जोडण्यात आली आहे. 870 कोटींच्या गैरव्यवहारात परदेशातून भुजबळांच्या कंपनीत पैशांची देवाण-घेवाण झाली होती. मनिलॉण्डरिंगच्या गुन्ह्याची कलमे या प्रकरणात लावण्यात आली होती. त्यात समीर भुजबळ यांना 1 फेब्रुवारी 2016 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. त्यानंतर छगन भुजबळ यांना अटक झाली होती. 

Web Title: Sameer Bhujbal High Court for bail