वानखेडेंच्या वडिलांकडून 1.25 कोटींची मागणी; मलिकांविरोधात मानहानीचा दावा

गेले काही दिवस सुरु असणारे आर्यन खान क्रुज ड्रग्ज प्रकरणा संबंधित अनेक धागेदोरे समोर आले.
NCB
NCBesakal
Summary

गेले काही दिवस सुरु असणारे आर्यन खान क्रुज ड्रग्ज प्रकरणा संबंधित अनेक धागेदोरे समोर आले.

गेले काही दिवस सुरु असणारे आर्यन खान क्रुज ड्रग्ज प्रकरणा संबंधित अनेक धागेदोरे समोर आले. याप्रकरणी मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे यांच्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाले. दरम्यान समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या वडिलांनी मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकला असून ज्ञानदेव वानखेडे (Dnyandeo Wankhede) यांनी मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे.

NCB
'ही कुठल्या मंत्र्याची बेनामी संपत्ती ? ठाकरे सरकार जवाब दो' - सोमय्या

मगील काही दिवस नवाब मलिक हे सातत्याने पत्रकार परिषद घेत आहेत. शिवाय ट्विटरवरुन त्यांनी एकामागून एक गौप्यस्फोट केले आहेत. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांनी संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी वानखेडे यांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. यासंबंधित ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी अर्शद शेख हे त्यांचे वकील आहेत. सोमवारी याबाबत कोर्टात सुनावणी होणार आहे.

NCB
भाजप नेत्याच्या भाच्याने आर्यनला क्रूजवर नेलं - नवाब मलिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com