"वानखेडेंना जात किंवा धर्मामुळे अडचण येणार नाही, कारण..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Ambedkar
"वानखेडेंना जात किंवा धर्मामुळे अडचण येणार नाही, कारण..."

"वानखेडेंना जात किंवा धर्मामुळे अडचण येणार नाही, कारण..."

क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर केलेल्या कारवाईवरून नार्कोटीक्स कन्ट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे चर्चेत आले आहेत. समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर समीर वानखेडेंनी नोकरी मिळवण्यासाठी खोट्या जात प्रमाणपत्रांचा आरोपही मलिकांनी केला होता. समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असताच आता वंचित बहूजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील त्यांची पाठराखण केल्याचं दिसतं आहे.

हेही वाचा: 'वीर दासला चाबकाचे फटके दिले पाहिजे'; 'शक्तीमान' भडकला

वडिलांनी मुस्लीम धर्म स्विकारला असला तरी, मी वयात आल्यानंतर तो स्वीकारलेला नाही हे जे वानखेडेंचं म्हणनं आहे, ते बरोबर असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. १८ वर्षाचा होईपर्यंत कुठलाही मुलगा आपल्या आई वडिलांच्या ताब्यात असतो, ते त्याचे गार्डीयन असतात. त्यामुळे त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट मुलाला लागू होत नाही असंही त्यांनी पुढे सांगितलं. पुढे ते म्हणाले की, त्यांना या प्रकरणात कोणतीही अडचण येईल असं आपल्याला वाटत नाही.

हेही वाचा: पोलीस बळाचा वापर करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल ; राणेंचा इशारा

दरम्यान, समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम असून, त्यांनी फक्त नोकरीत संधी मिळवण्यासाठी मागासवर्गीय जात असल्याचे पुरावे वापरल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी हे आरोप करताना त्यांच्या शाळेच्या दाखल्याचे काही पुरावे समोर ठेवले आहेत. यामध्ये काही ठिकाणी समीर वानखेडेंचे पुर्ण नाव समीर दाऊद वानखेडे आणि धर्म मुस्लीम असल्याचा दिसतो आहे. तर क्रांती रेडकर यांनी हे सर्व कागपत्रांवर झालेल्या चुकांमुळे झाले असल्याचे सांगितले आहे.

loading image
go to top