'वीर दासला चाबकाचे फटके दिले पाहिजे'; 'शक्तीमान' भडकला | Mukesh Khanna | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vir das and mukesh khanna

'वीर दासला चाबकाचे फटके दिले पाहिजे'; 'शक्तीमान' भडकला

प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन वीर दासने Vir Das त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘टू इंडियन’ हा एकपात्री प्रयोग अपलोड केला होता. त्यातील वक्तव्यामुळे वीर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वीर दासवर भारताचा अपमान केल्याचा आरोप होत आहेत. वीरने त्याबद्दल जाहीर माफी मागितली असली तरीदेखील सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. आता यावर 'शक्तीमान' फेम अभिनेते मुकेश खन्ना Mukesh Khanna यांनी इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.

मुकेश खन्ना यांनी एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणतात "जो कॉमेडियन स्वत:ला वीर दास म्हणवतो आणि स्वत:ला यशस्वी कॉमेडियन समजतो, त्याने स्टॅंडअप कॉमेडीचं नाव खराब केलं आहे," स्टँड-अप कॉमेडीवर प्रश्न उपस्थित करत मुकेश खन्ना यांनी विचारलं, "स्टँडअप कॉमेडी म्हणजे नक्की काय, हे मला आजपर्यंत समजलं नाही. रस्त्यावर उभं राहून तुम्ही शिवीगाळ करता किंवा कोणाच्या चुका मोजता, त्यावर लोक टाळ्या वाजवतात आणि मग त्याला तुम्ही यश समजता का? आजकाल कॉमेडीचा दर्जा खूप खालावला आहे. कॉमेडी करण्याचे अजूनही वेगवेगळे मार्ग आहेत. पण तुम्ही लोकांना नकारात्मक गोष्टींवर का हसवता? त्यापेक्षा तुम्ही त्यांना सकारात्मक गोष्टींवर हसवलं पाहिजे."

हेही वाचा: 'तो जे बोलला त्याच्याशी सहमत'; काम्या पंजाबीचा वीर दासला पाठींबा

वीर दासला फटकारत मुकेश खन्ना पुढे म्हणाले, 'वीरदासला हे सिद्ध करायचं आहे का की, तो खूप धाडसी आहे? भारताची दुसरी बाजू काहीही दिसली तर ती आपल्या समाजातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या आधारे नंतर सुधारता येईल, किंबहुना सुधारली जात आहे. खरं तर वीर दासला ऑडिटोरियममधील लोकांकडून जेवढ्या टाळ्या मिळाल्या तितकेच चाबकाचे फटके दिले पाहिजे. भारत हा छोटा देश नाही. भारत १३० कोटी लोकसंख्येचा देश आहे. ज्यात सुधारणा घडवणं इतकं सोपं नाही. फक्त डायलॉग आणि कविता लिहिणंच सोपं आहे. त्यांनी टाळ्या वाजवल्या, म्हणजे तुला यश मिळालं? असं होत नाही."

हेही वाचा: 'तुम्ही इथून निघून जा'; बिग बी स्पर्धकाला असं का म्हणाले?

वीर दासच्या या संपूर्ण व्हिडिओतली एक छोटी क्लिप ट्विटरवर प्रचंड व्हायरल झाली आहे. ही क्लिप पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलं आहे. पण काही नेटकरी त्याला पाठिंबा देतानाही दिसत आहे.

loading image
go to top