
'स्वराज्य' हे विस्थापितांचं, संघटित करण्याचं काम सुरू - संभाजीराजे
औरंगाबाद : स्वराज्य हे विस्थापितांचं आहे त्यांना संघटित करण्याचं काम सध्या सुरू आहे असं संभाजीराजे म्हणाले आहेत. सध्या तरी मी विस्थापित लोकांना संघटित करण्यासाठी झटत आहे राज्यसभेच्या निवडणुकासाठी मला जबाबदारी दिली नाही हा इतिहास आहे त्यावर मला भाष्य करायचं नाही असंही ते म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीराजे हे औरंगाबादमध्ये गेले असताना माध्यमांना बोलत होते.
"सध्या महाराष्ट्रात अनेक मोठे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांचे आहेत, शेतकऱ्याचे आहेत, पावसाची चिंता आहे पण जे कुणाचं सरकार असेल ते लवकर स्थापन व्हावं असं ते म्हणाले. आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती असल्याने त्यांनी अभिवादन केलं असून त्यांनी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलणं टाळलं आहे. दरम्यान त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य या संघटनेसाठी काम करत असल्याचं सांगितलं आहे. आपली संघटना ही विस्थापितांची आहे त्यांच्यासाठी आपण काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचं कबूल केलं होतं पण ऐनवेळी शिवसेनेने संभाजीराजे यांचे फोन उचलले नाहीत आणि त्यांच्या ऐवजी संजय पवारांना राज्यसभेची उमेदवारी दिली. पण या निवडणुकीत संजय पवार यांचा पराभव झाला आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. त्यानंतर संभाजीराजे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला होता.