
मुंबई ते नागपूर हा ७०१ किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. त्यापैकी ६२५ किमी लांबीचा महामार्ग सुरू झाला आहे. आता यातला शेवटचा ७६ किमी लांबीचा टप्पा गुरुवारपासून सुरू होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. इगतपुरी ते आमणे असा हा शेवटचा टप्पा आहे.