samruddhi mahamarg nails incident latest update
esakal
महाराष्ट्र बातम्या
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर कुणी अन् का ठोकले १०० हून अधिक खिळे? नेमकं कारण आलं समोर...
Samruddhi Mahamarg Nails Incident : संभाजीनगरच्या दौलताबाद परिसरातील ही घटना घडली. या ठिकाणी समृद्धी महामार्गवर १०० पेक्षा जास्त खिळे ठोकले आहेत. त्यामुळे मध्यरात्री ३ ते ४ वाहनांचे टायर फुटले.
100+ Nails on Road Cause Punctures : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असतो. हा महामार्ग आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे या महामार्गावर १०० पेक्षा जास्त खिळे ठोकल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे अनेक गाड्यांचे टायर पंचर झाले असून मध्यरात्री चार तास वाहतूक खोळंबली. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
