फडणवीसांचे स्वप्न असलेल्या समृद्धी महामार्गाला आता बाळासाहेबांचे नाव?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार विनायक राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. तर, भाजपने आधीच दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच नाव देण्याची घोषणा केली होती. 

मुंबई : मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या तयारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार विनायक राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. तर, भाजपने आधीच दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच नाव देण्याची घोषणा केली होती. 

पायाभूत प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उद्धव ठाकरे

समृद्धी महामार्गाला आधी शिवसेनेने जोरदार विरोध केला होता. नाव देण्यावरून सत्तेत असलेल्या सेना- भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद झाले होते. अखेर मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचच नाव देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर

ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने फडणवीस यांच्या काळात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिलेली आहे. मात्र, समृद्धी महामार्गाविषयी कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. आता या मार्गाच्या नावावरून शिवसेना आपल्या मतावर ठाम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samruddhi National Highway to be named as Balasaheb Thackeray National Nighway