'संत ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणवून घेतले होते, त्यामुळे..'

मनसेच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे, हनुमान चालिसा अन् महाआरतीवरून डिवचंल
political
politicalgoogle
Summary

मनसेच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे, हनुमान चालिसा अन् महाआरतीवरून डिवचंल

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वक्तव्य केलेला मशिदीच्या भोंग्यांचा प्रश्न चर्चेत आहे. या मुद्द्यावरून राज्यातील मनसे आणि अध्यक्ष राज ठाकरे (Mns President Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्यावरून सध्या शिवसेना आणि मनसेत अनेक टोलेबाजी सुरु आहे. शनिवारी राज ठाकरे यांच्याकडून पुण्यात महाआरती करण्यात आली. दरम्यान, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतही हनुमान मंदिरात आरती करण्यात आली. आता या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत शिवसेनेसह महाविकास आघाडीतील इतर पक्षांना टोला लगावला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे ट्विटमध्ये म्हणतात, 'संत ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणवून घेतले होते. सहजच आठवलं... त्याचा नास्तिकांनी आणि नवपुरोगाम्यांनी केलेल्या महाआरतीशी संबंध नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

political
नारायण राणेंच्या अडचणी वाढणार? जमीनी प्रकरणाबाबत चौकशीचे आदेश

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना उत्तर म्हणून हनुमान चालिसेचं पठण करण्याचे आदेश कार्यकर्त्यांनी दिले. शनिवारी स्वत: राज ठाकरे हे पुण्यातील खालकर मंदिरात महाआरतीला उपस्थित राहिले आणि यावेळी कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसेचं पठणही करण्यात आलं आहे. दुसरीकडे युवासेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतही हनुमान मंदिरात आरती करण्यात आली. त्यामुळे हनुमान चालिसा पठणवरून मनसेने आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे. ठाकरेंच्या या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात आणि मनसेच्या राजकीय वर्तुळातही अनेक बदल झाले आहेत.

राज ठाकरे आणि हिंदुत्त्वाचं राजकारण

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात झालेल्या भाषणातून आणि ठाण्यात झालेल्या सभेतूनही आगामी काळात मनसे हिंदुत्त्वाचं राजकारण करणार असल्याचे संकेत दिले आहेत. मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने हिंदुत्त्वाची स्पेस काबीज करण्यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जात असल्याचं वारंवार दिसत आहे. राज यांनी मागील काही भाषणांमध्ये केवळ महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करणं टाळलं आहे. त्यामुळे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून मनसेकडून भाजपसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

political
राऊतांच्या आरोपांनंतर सोमय्यांचं थेट आयुक्तांना पत्र, IAS अधिकारी निशाण्यावर?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com