MNS On CM Thackeray I एक बर झालं CM ठाकरेंची करोनाची भीती गेली अन् ते बाहेर पडले, मनसेनं डिवचलं | Sandeep Deshpande On Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sandeep Deshpande On Uddhav Thackeray

गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाट लावली आहे. असो.., संदीप देशपांडेंचा टोला

'बर झालं CM ठाकरेंची करोनाची भीती गेली अन् ते बाहेर पडले'

विधान परिषदेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सध्या शिवसेना आमदारांना घेऊन गुवाहटी येथे आहेत. त्यामुळे सत्तेचा सस्पेन्स वाढत असल्याने राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे आणि पर्यायानं महाविकास आघाडी सरकारला चॅलेंज केलं आहे. दरम्यान, या सगळ्या वादात आता मनसेनं उडी घेतली आहे. (maharashtra politics) मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटवरून मख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (MNS sandeep deshpande On CM Thackeray)

एकनाथ शिंदे यांनी ४१ आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे. मी मुख्यमंत्री म्हणून ज्यांना नको आहे त्यांनी समोर येऊन सांगावं मी राजीनामा देतो, असं काल मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री काल रात्री उशिरा वर्षा बंगाल सोडून मातोश्रीवर दाखल झाले आहेत. यावेळी अनेक शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, यावरून देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला आहे.

हेही वाचा: एकनाथ शिंदेंसमोर भाजपची मोठी अट? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

काय आहे संदीप देशपांडेंचे ट्वीट?

फेसबुक लाईव्ह, कोमट पाणी, सोशल डिस्टन्स, सहानभूती, नुसत्या शाब्दिक कोट्या, भावनिक गोष्टी, विकटीम कार्ड यांनीच गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाट लावली आहे. असो.. या सगळ्यात एक बर झालं मुख्यमंत्रांची करोनाची भीती गेली आणि ते बाहेर पडले, असा खोचक टोला त्यांनी लगावाला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी सर्व सूत्र हातात घेतल्याचं स्पष्ट झालंय. त्यांनी कायदेशीरपणे जाण्याचा प्रयत्न केला आहे. ईडीच्या कचाट्यात सापडलेले प्रताप सरनाईक सध्या शिंदेंसोबत आहेत. सूनील प्रभूला बघू, असंही ते म्हणाले. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीला यश आल्याचं दिसतं आहे. सेनेचे जवळपास ४१ आमदार शिंदे गटात सामील झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई, खान्देश, कोकण आणि मराठवाड्यातील मोठं संख्याबळ एकत्र करण्यात शिंदेंचा प्लॅन यशस्वी झाला असल्यानं आता ठाकरे यांना सहकार्य करणारे फक्त १४ आमदार उरले आहेत.

हेही वाचा: एकनाथ शिंदेंच्या गटात आमदार का निघालेत हे लवकरच समजेल - संजय राऊत

Web Title: Sandeep Deshpande Criticized To Cm Thackeray On Yesterday Went To Matoshri Covid 19 Situation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top