Sandeep Deshpande: स्टंप घेऊन आलेल्यांचा कोच कोण हे माहीत आहे; संदीप देशपांडेंचा हल्ल्याबद्दल खुलासा

हल्ल्यामागचा सूत्रधार लवकरच समोर येईल असंही संदीप देशपांडे म्हणालेत
Sandeep Deshpande
Sandeep DeshpandeEsakal

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या भांडूप भागातून या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यापैकी एक आरोपी अशोक खरात हा ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आज संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.

यावेळी बोलताना संदीप देशपांडे यांनी काल घडलेला घटनाक्रम सांगितला आहे. तर मी घाबरणार नाही. मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये. पोलिस तपास करत आहेत. त्यांचा तपास पूर्ण व्हायचा आहे. तेव्हा सर्व बाहेर येईल. हे सर्व कोणी केलं हे आम्हाला माहीत आहे. मी माझं सविस्तर म्हणणं FIR मध्ये सांगितलं आहे असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

Sandeep Deshpande
Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात अटक केलेला आरोपी ठाकरे गटाचा पदाधिकारी

तर पुढे ते म्हणाले की, हल्लेखोरांचे कोच देखील आम्हाला माहीत आहेत. पोलिसांचा तपास योग्य रीतीने सुरू आहे, तो पूर्ण होईपर्यंत मी काहीही बोलणार नाही, तर या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. त्यांनी विचारपूस केली. सुरक्षेच्या कारणास्तव 2 पोलिस नेमले, परंतु मी कोणाला घाबरत नाही त्यामुळे मी विनम्रपणे सुरक्षा परत करतो असंही देशपांडे यांनी यावेळी सांगितलं आहे.

आम्ही कोरोना काळातील घोटाळा उघडकीस आणणार होतो. त्याआधीच माझ्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. आता पोलिसांनी मला नाही तर त्यांना सुरक्षा द्यावी. मी कोणाला घाबरत नाही. मी दोन दिवसात नवा घोटाळा बाहेर काढणार होतो त्याचा सुगावा हल्लेखोरांना लागला असेल त्यामुळे त्यांनी माझ्यावर हल्ला केला असावा असंही देशपांडे यांनी यावेळी म्हंटलं आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करत असताना काल (शुक्रवारी) चार अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही व्यक्तींनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता.

Sandeep Deshpande
Amol Kolhe : 'माझ्याकडून ‘तो’ शब्द चुकलाच म्हणत', अमोल कोल्हेंनी व्यक्त केली दिलगिरी

संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे यांना थोडा मार लागला आहे. या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसैनिकांनी संताप व्यक्त केला. तर, याची माहिती समजताच शिवाजी पार्क पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला होता.

Sandeep Deshpande
Mahavikas Aghadi : "मविआने एकजूट दाखवली तर 2024ला राज्यात सत्ता येईल"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com