Shivsena: शिंदे गटाकडून ठाकरेंना खोक्याचे उत्तर 'खोक्या'ने; भुमरेंचा मोठा गौप्यस्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray and Sandipan Bhumre

Shivsena: शिंदे गटाकडून ठाकरेंना खोक्याचे उत्तर 'खोक्या'ने; भुमरेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून सरकार स्थापन केले, तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीका करण्यात येत आहे. शिंदे गटाला गद्दार आणि खोके सरकार म्हणून हिणवण्यात येत आहे. मात्र आता ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या खोके सरकार य़ा टीकेला अखेर शिंदे गटाने खोक्याने प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. (Sandipan Bhumare news in Marathi)

हेही वाचा: Video : अमित शहांनी कॅमेऱ्यासमोरच मुलाला झापलं? काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर करत दावा

एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आज हल्लाबोल केला. एका कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या खोके सरकार टीकेला प्रत्युत्तर दिलं. संदीपान भुमरे म्हणाले की, खरे गद्दार तुम्ही आहे. गडाख यांच्यासोबत तुम्ही काय व्यवहार केला हे आम्हाला माहित आहे. उगाच गडाख यांना तुम्ही मंत्री केलं नाही. तुमच्याकडे मंत्री, आमदार होते. तुम्हाला गरज काय होती, गडाखांची. एखादा शिवसैनिक का नाही मंत्री केला? असा सवाल भुमरे यांनी केला. तुम्ही गडाख यांच्याकडून किती खोके घेतले, हे आम्हाला माहित असल्याचं भुमरे यांनी म्हटलं.

या कार्यक्रमात गडाख यांचे व्याही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीचा उल्लेख करत भुमरे यांनी, हा पक्षाचा मेळावा आहे, नात्यांचा नाही म्हणत मिश्कील टिप्पणी केली. त्यामुळे सभागृहात हशा पिकला होता.

हेही वाचा: Eknath Shinde: शिंदे गटाकडून दसऱ्यापूर्वीच आदित्य ठाकरेंना जबरदस्त ‘हादरा'

भुमरे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले की, यांना गोचिड ताळमेळ लागू देत नाही. तत्कालीन मंत्री सुभाष देसाई यायचे आणि आमच्याशी बोलत नसे. आम्ही बोललो की, म्हणायचे मी चाललो मिटींगमधून. अरे आम्ही संघर्ष केला. मात्र यांनी अपक्ष आमदारांना मंत्री केलं. यांना वाटलं नाही, की संदीपान भुमरेंना पालकमंत्री करावं. एखाद्या जिल्ह्यात गेलो की, कुणी बुके घेऊन येत नव्हतं, अशी खंतही भुमरे यांनी व्यक्त केली.