Rohit Patil : ...तरच महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू होणार; रोहित पाटलांनी सांगितली अटकळ

Rohit Patil
Rohit Patilesakal

सांगलीः जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी आज सांगलीमध्ये मोर्चा निघाला. या मोर्चाला संबोधित करतांना स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी हिमाचल प्रदेशमधला एक किस्सा सांगून तसं झालं तरच महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू होईल, असं नमूद केलं.

राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी राज्यभरातून होत आहे. याचसंदर्भात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक बोलावली आहे. दरम्यान, या मागणीसाठी आज सांगलीमध्ये शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठा मोर्चा काढला.

या मोर्चामध्ये बोलतांना रोहित पाटील म्हणाले की, मोर्चाच्या निमित्ताने का होईना महाराष्ट्र नव्याने नवे दिवस बघेल. कारण जुनी पेन्शन योजना हा हक्क आहे. एका वरिष्ठ नेत्याने राज्य दिवाळखोरीत निघेल, असं विधान केलं होतं. परंतु हिमाचल प्रदेशमधल्या लोकांनी माजी मुख्यमंत्र्यांना याच मुद्द्यावरुन घरी बसवलं आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये जसं झालं तसंच इथंही होणार तेव्हाच जुनी पेन्शन लागू होईल, असं रोहित पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानाची राज्यभर चर्चा होत आहे. राज्यभर जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरुन रान पेटलं आहे. तिकडे केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेदेखील निर्णय घ्यावा, असं शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com