Sangli District Bank Election
esakal
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी पार पडल्या असून, दोन्ही पदांवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे महेंद्र लाड यांची अध्यक्षपदी, तर शिवसेना शिंदे गटाचे तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे जिल्हा बँकेच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, या निवडीच्या वेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित नसल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.