
या खटल्यात राज ठाकरेंना ११ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार? शिराळा कोर्टाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
सध्या राज्यसभा आणि विधानपरिदेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. अनके राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासंदर्भात एक वेगळी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात सांगलीतील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. वॉरंट हुकूम बजावूनही ते हजर न राहिल्याने न्यायालयाने (Shirala court) काल (बुधवारी) त्यांना पुन्हा अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. (Raj Thackeray latest news)
मागील काही दिवसांपूर्वी रेल्वे भरतीमध्ये २००८ मध्ये 'स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या,' या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात कल्याण कोर्टाच्या आदेशाने राज ठाकरेंवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला होता. त्यावेळ जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडलं होतं. दरम्यान, विनापरवाना बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या खटल्यात राज ठाकरेंना ११ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा: 'शेतकऱ्यांसाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना आमदार नक्की मतदान करतील'
वारंवार गैरहजर राहिल्याने शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी २८ एप्रिल २००२ रोजी राज ठाकरे यांच्यासह १० जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. याप्रकरणी काल (८ जूनला) सुनावणी झाली. या सुनावणीला राज ठाकरे गैरहजर राहिले. यानंतर कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं आहे. करोनाची लागण झाल्याने राज काल झालेल्या सुनावणीला गैरहजर राहिले असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या सुनावणीसाठी मनसेचे नेते शिरीष पारकर (Shirish Parkar) उपस्थित होते. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. पण राज ठाकरे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं आहे. आता यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील सुनावणीसाठी तरी राज ठाकरे उपस्थित राहणार का असा सवाल उपस्थित होतं आहे.
हेही वाचा: CM ठाकरेंची विराट सभा पाहून विरोधकांची बुबुळं बाहेर आली - राऊत
Web Title: Sangli Shirala Non Bailable Warrant Register By Shirala Court Against Raj Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..