सांगली, सोलापूर, नांदेडमध्ये पावसाची रिमझिम सुरु

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

राज्यातील काही भागात आज (बुधवार) पावसाला सुरवात झाली. सांगली, सोलापूर आणि नांदेडमध्ये पावसाची रिमझिम पाहिला मिळाली. या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे चांगलाच गारवा जाणवला. 

सांगली : राज्यातील काही भागात आज (बुधवार) पावसाला सुरवात झाली. सांगली, सोलापूर आणि नांदेडमध्ये पावसाची रिमझिम पाहिला मिळाली. या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे चांगलाच गारवा जाणवला. 

सांगली जिल्ह्यातील तासगाव, सांगली, मिरज शहर परिसरात विजांच्या कडकडाटांसह गारांचा मुसळधार पाऊस पडला. सांगली आणि तासगाव तालुक्यात अनेक ठिकाणी गारांच्या पावसामुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसत आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून, जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली. याशिवाय गेल्या अनेक दिवसांपासून कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नांदेडमधील नागरिकांना या मुसळधार पावसामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे.

Web Title: In Sangli Solapur Nanded the rain started