#votetrendlive पराभवाची जबाबदारी स्वीकारून निरुपम यांचा राजीनामा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या दयनीय कामगिरीची जबाबदारी स्वीकारत कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केला आहे. राजीनामा दिल्यानंतर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत निरुपम यांनी मुंबई कॉंग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असतानाच पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुंबई कॉंग्रेसमध्ये गटबाजी चव्हाट्यावर आली होती. त्याचा फटका कॉंग्रेस उमेदवारांना बसला. त्यामुळे या पराभवाची जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देत असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.
Web Title: sanjay nirupam resign