.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मालवण (जि. सिंधुदुर्ग) : राजकोट येथील पुतळा दुर्घटनेनंतर सरकारने जनतेची माफी मागितली असली तरी त्याने असे प्रश्न सुटत नाहीत. हे प्रकरण सरकारच्या गळ्याशी आले आहे. सरकार पूर्णपणे या प्रकरणात अडकले असून त्यांना बाहेर तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नाही. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असून यामागे ‘ठाणे कनेक्शन’ असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.