BJP: संजय राऊत यांना भाजप नेत्याचा फोन अन् चर्चांना उधाण

संजय राऊत यांना भाजपच्या दिल्लीतील मोठ्या नेत्याचा फोन
Sanjay Raut
Sanjay Raut esakal

शिवसेनेचे एक हाती लढवय्ये संजय राऊत १०३ दिवसानंतर तुरुंगातून बाहेर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली. अशातच, भाजपच्या दिल्लीतील बड्या नेत्याने राऊत यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तुरुंगातून बाहेर येताच राऊतांचे सुर बदलले, संजय राऊत भाजपशी हातमिळवणी करणार का? की भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. (Sanjay Raut Bjp leader phone Devendra Fadnavis Amit Shah bjp Narendra Modi maharashtra politics )

संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामींनी फोन करून त्यांची विचारपूस केली आहे. अशी माहिती दिली. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये काय बोलणं झालं हे राऊत यांनी सांगितलं नाही.

दरम्यान, राऊत यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेणार असल्याचं सांगितलं. आपल्यासोबत काय करण्यात आलं याची माहिती देणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे राऊत मोदी आणि शहांकडे काय तक्रार करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच, यावेळी राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केलं आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत?

आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार. मी काही दिवसात पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनाही भेटणार आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे. ते घटनात्मक पदावर आहेत मग त्यांना भेटलं तर काय हरकत आहे. मी ईडी विरोधात बोलणार नाही. माझ्या मनात कोणाही विषयी काही नाही.

"देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय चांगले घेतले आहेत. सरकार हे सरकार असतं, चांगल्या निर्णयांचं स्वागत झालं पाहिजे," असंही राऊत यांनी म्हटलं. शिवाय, कटुता संपवण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेचंही त्यांनी स्वागत केलं.

राऊत यांचे ही विधान पाहून राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. भाजपशी हातमिळवणी करणार का? असा सवालही उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com