PM मोदी हे हिटलरला फॉलो करतात; संजय राऊत यांचा टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

PM मोदी हे हिटलरला फॉलो करतात; संजय राऊत यांचा टोला

राज्यात मविआ सरकार आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाचा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.युवा सेनेच्या मेळाव्यात संजय राऊत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, युध्दात सगळं काही क्षम्य असतं, पण प्रेमात नैतिकता पाळायला पाहीजे, जेव्हा अंगवर येत असेल तर तुम्ही नैतीकता पाळणार नसाल, तसेच तुम्ही पाठीमागून वार करणार असाल तर तुमचा कोथळा काढण्याचा मला अधिकार आहे असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत.

लोक म्हणातात संजय राऊत बाळासाहेबांचा गोबेल्स आहे, कारण जे नेत्याची भूमिका आहे ती मला मिळेल त्या साधणातून लोकांपर्यंत पोहचवायलाच हवी, हिटलर नंतर पराभूत झाला असेल, पण तो लोकप्रीय नेता होता, बाळासाहेब ठाकरेंनाही हिटलर प्रिय होता, सध्याचे पंतप्रधान देखील हिटलरच्या प्रेमात आहेत, त्यामुळे हिटलरतं कोणी कौतुक करत असेल, तर त्यावर राजद्रोहाचा गुन्हा होऊ शकत नाही, असा टोला देखील त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

हेही वाचा: पवार कंपनीपासून राज्याला वाचवण्याची हीच वेळ - खोत

राऊत म्हणाले की, हिटलरने प्रचाराचं महत्व सांगितलं आहे. हिटलर गोबेल्सच्या माध्यमातून इव्हेंट्स फार करायचा मोदी हिटलरला फॉलो करतात, ज्या प्रकारचे इव्हेंट हिटलर करत असे तसेच इव्हेंट मोदी आणि त्यांचा पक्ष करतोय असे राऊत म्हणाले. जेव्हा जगात हिटलरची बदनामी सुरू होती तेव्हा १९३५ चं ऑलम्पिक हिटलरनं जर्मनीत भरवलं आणि जगाला दाखवून दिलं की हिटलर किती महान आहे. आज वेगळं काय घडतंय, आपल्याला देखील याच मार्गाने पुढे जावे लागेल असे राऊत म्हणाले.

हिटलरच्या आणि मोदींच्या प्रचारात बरंच साम्य आहे. विरोधकांना बदणाम करण्याचा प्रयत्न झाला ती हिटलरनीती आहे, विरोधी पक्षाना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे राज्य टीकवायचे असेल, आणि या प्रवत्तीविरोधात लढायचे असेल तर समोरच्या लोकांप्रमाणे आपल्या लोंकाना तयार करावे लागेल, असे राऊत म्हणाले.

राहुल गांधीना २०१४ साली बदनाम करण्याचं काम भाजपनं केलं, सोशल मिडीयावर त्यांना बदनाम करण्यात आलं, भाजपच्या आयटी सेलचं सगळ्यात जास्त बजेट राहूल गांधीची बदनामी करण्यासाठी खर्च होतं, असे राऊत म्हणाले. पुढे बोलताना

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना पंतप्रधान मोदींविषयी ट्विट केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी अटक केलं, पण भाजपने सोशल मिडीयाच्या माध्यमातून तो कसा देशद्रोही आहे, हा प्रसार करण्यात आला, असे राऊत म्हणाले. तसेच मुंबईत सुशांत सिंह राजपूत, कंगना राणावत तसेत आमच्यावरील खोटे आरोप असतील या प्रकरणामध्ये खोटा प्रचार सोशल मिडीयामधून केला गेला, असा आरोप राऊत यांनी केला.

हेही वाचा: ड्रोनद्वारे पाकमधून येतात ड्रग्स, हत्यारं; खलिस्तान्यांचा धक्कादायक खुलासा

सोमय्या जेलमध्ये जाणारच..

किरीट सोमय्या आणि नील सोमय्या प्रकरणावर बोलताना राऊतांनी विक्रांत घोटाळ्यात त्यांना जामीन मिळाला असेल पण मी सांगीतलं पण बाप बेटे जेल जायेंगे, प्रकरण अजून चालू आहे, आणि परत सांगतो ते जेलमध्ये जाणार आहेत असे सांगीतले.

Web Title: Sanjay Raut Criticized Bjp And Pm Narendra Modi In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top