Sanjay Raut: भाजपनं महाराजांना माफीवीर म्हटलं, तरीही तुम्ही.. महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय; राऊत भडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

Sanjay Raut: भाजपनं महाराजांना माफीवीर म्हटलं, तरीही तुम्ही.. महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय; राऊत भडकले

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे खासदार आक्रमक झाले आहेत. माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी भाजपसह राज्यापालांवर हल्लाबोल केला आहे.

बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा आधी अपमान केला तेव्हा भाजप शांत बसला. पण आता राज्यपालांनी थोर पुरूषांचा अपमान सहन करत आहात ही तुमची अधिकृत भूमिका आहे का? असा प्रश्नही संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा: NCP: 'उतरत्या वयात धोत्रात घाण...'; राष्ट्रवादीकडून राज्यपालांच्या विरोधात बॅनरबाजी

पुढे बोलताना ते म्हणाले की, शिंदे गटाकडे थोडा जरी स्वाभिमान असेल तर शिंदे गटाने राज्यपालांचा राजीनामा मागवा. भाजपला त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी. राज्याचा स्वाभिमान असणाऱ्या शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दळभद्री आहे. यामुळे जनतेचा स्वाभिमान पुन्हा दुखवला गेला आहे. त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. हे सर्व भाजपची अधिकृत भूमिका आहे का? सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अपमान करायचा, महाराजांनी कधी 5 वेळा माफी मागितली सांगा हे आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे. ते आता राज्याचे सहयोगी आहेत.

हेही वाचा: Sudhanshu Trivedi: “छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली” भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

सावरकरांसाठी रस्त्यावर उतरलात, स्वागत आहे. जोडे मारलेत, स्वागत आहेत. आता हे जोडे कुणाला मारणार आहात? भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला मारणार आहात की राज्यपालांना मारणार आहात? ज्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्यांना जोडे मारणार का? तुम्ही जोडे मारले नाही तर जोडे कसे मारतात हे आम्ही दाखवून देऊ; असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

अफजल खानाच्या कबरी तोडण्याची नाटकं कशाला करता करता? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांचा जयजयकार कशाला करतात? नौसेनेला महाराजांचं चिन्हं दिलं ते कशासाठी दिलं? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली स्वाभिममानाचं तुणतुण वाजवलं. महाराजांचा अपमान होऊन 72 तास झाले. आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? असा प्रश्नही त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांनी या घटनेचा साधा निषेध केला नाही. इतके तुम्ही घाबरता? हा भाजपने केलेला अपमान आहे. तुम्ही राजीनामा द्यायला हवा होता. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता, असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत.