NCP: 'उतरत्या वयात धोत्रात घाण...'; राष्ट्रवादीकडून राज्यपालांच्या विरोधात बॅनरबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

NCP: 'उतरत्या वयात धोत्रात घाण...'; राष्ट्रवादीकडून राज्यपालांच्या विरोधात बॅनरबाजी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मागच्या काही काळापासून वादग्रस्त विधानं करत आहेत. विशेषतः महापुरुषांबद्दल बोलतांना त्यांची जीभ घसरलेली आहे. शनिवारी औरंगाबाद येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली.

यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छ.शिवाजा महाराज यांच्या बद्दल बोलताना वादग्रस्त विधान केलं होते. त्याचे पडसाद काल दिवसभर दिसून आले. मात्र आज पुण्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संदिप काळे यांनी शहरातील अनेक भागात फ्लेक्स लावले आहेत.

तर त्या फ्लेक्सवर "उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध" असा मजकूर छापण्यात आला आहे. तर एक टिप दिली आहे, त्यात लिहिले आहे की 'राज्यपाल भगतसिंग कोश्यारीचे धोतर फाडणाऱ्या व फेडणाऱ्यास रूपये एक लाख रूपये रोख रक्कम देण्यात येईल'.

हेही वाचा: Bhagat singh Koshyari: राज्यपालांना आधी महाराष्ट्राबाहेर हाकला; संभाजीराजे कोश्यारींवर भडकले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना केली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या या विधानावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहेत. दरम्यान राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया छत्रपती संभाजी यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :punencp leader