
महाराष्ट्र पोलिस राजकीय दबावाखाली कोणतही काम करत नाहीत - खासदार राऊत
गिरीश महाजन प्रकरणात फडणवीसांनी कुभांड रचलंय; राऊतांचा हल्लोबोल
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बनं राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान, भाजप नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) यांना अडकवण्यासाठी करण्यात आलेल्या षडयंत्रामागे सरकारी वकील आणि पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. आता त्यांच्या या ओरोपाता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. गिरीश महाजन प्रकरणात फडणवीसांनीच कुभांड रचलंय, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा: साहेब पिक्चरमध्ये येत नाहीत, तर ते...; फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब
ते म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांच (Devendra Fadnavis) काम असतं आरोप, सनसनाटी निर्माण करणं, कालही त्यांनी तसाच आरोप रचला. महाराष्ट्र पोलिस राजकीय दबावाखाली असं कोणतही काम करत नाहीत. आमचे फोन ज्यांनी टॅब केलं त्यांनी कुभांड रचलं आहे. महाआघाडीला पोलिसांना जर असं करायला लावयांच असेल तर त्यांना ईडीकडे (ED) प्रशिक्षणासाठी पाठवावं लागेल. खोटं काही करण्यासाठी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री महाराष्ट्र पोलिसांना प्रशिक्षण घेऊ देणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे ते म्हणाले, फडणवीस यांनी सनसनाटी निर्माण केली आहे. भाजपाचे सलीन जावेद कोण आहेत? ही स्क्रीप्ट कुणी लिहली आहे. त्यातली पात्र, नेपथ्य कुणाचं आहे. याच्या तळाशी महाविकास आघाडी सरकार जाईल आणि दुसरा पेन ड्राईव्ह सादर करेल. महाराष्ट्र पोलिस हे संस्कारी पोलिस आहेत. ते असं खोटं काम करणार नाहीत. ते काम फक्त केंद्रीय तपास यंत्राणा करु शकतात, त्यांनी भाजपा कडून तसे प्रशिक्षण घेतले असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
हेही वाचा: सेनेतील जुन्या नेत्यांचा मला खास मेसेज; राणेंचा आणखी एक गौप्यस्फोट
Web Title: Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis On Girish Mahajan Topic Of Pen Drive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..