"राजकारणात काहीच कायमचं नसतं, भाजपच्या अहंकाराची माती होईल" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut and PM Narendra Modi

"राजकारणात काहीच कायमचं नसतं, भाजपच्या अहंकाराची माती होईल"

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला अपयश आले. या निवडणुकांमध्ये शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. यावर शिवसेनेला राज्याच्या राजकारणातून बरीच टीका सहन करावी लागली. आता शिवसेनेचे खासदार तथा सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या रोखठोकमधून भाजपावर ताशेरे ओढले. राष्ट्रीय नेता म्हणून मोदींना आज पर्याय नाही पण तो पर्याय शेवटी लोकच निर्माण करतील आणि अहंकाराची माती होईल, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदींवर टिकास्र सो़डले.

विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले नाही आणि यावरुन भाजपाने शिवसेनेवर टीका करत शिवसेनेची खिल्ली उडवली होती. यावर सामनाच्या रोखठोकमधून शिवसेनेने भाजपाला प्रतिउत्तर दिले आहे. सामना रोखठोक मध्ये म्हटले, “गोव्यात भाजपास 20 जागा मिळाल्या फक्त इतरांनी केलेल्या मतविभागणीने. पणजीतून बाबूश मोन्सेरात व त्यांच्या पत्नी जेनिफर जिंकल्या. हे बाबूश महाशय जिंकल्यावर म्हणतात, 'आमच्या विजयात भाजपचे काडीमात्र योगदान नाही. आम्ही आमच्या ताकदीवर जिंकलो.' मुंबईत गोव्याचा विजय साजरा करणाऱयांनी बाबूश महाशयांचे हे उद्गार लक्षात ठेवले पाहिजेत. गोव्यासारख्या राज्यात कोणीही जिंकले तरी तो विजय खरा नसतो.”

हेही वाचा: विक्रीसाठी नेणारे सातशेहून अधिक पक्षी ताब्यात; वन अधिकाऱ्यांचा छापा

पाच राज्यांतील निकालाने भाजपचा अहंकार वाढला आहे, असे म्हणत सामनाच्या रोखठोकमधून भाजपला चांगलेच सुनावले. “राजकारणात काहीच कायमचे नसते. मग ते उत्तर प्रदेश असो, नाहीतर महाराष्ट्र. राष्ट्रीय नेता म्हणून नरेंद्र मोदी यांना आज पर्याय नाही. पण तो पर्याय शेवटी लोकच निर्माण करतील व अहंकाराची माती होईल. पाच राज्यांतील निकालाने अहंकाराची पातळी वाढली ती कमी झाली तरी पुरे!”

हेही वाचा: ऑनलाइन पद्धतीने स्वगणनाही शक्य; केंद्राकडून नियमांत बदल

गोव्यामध्ये संजय राऊत यांनी चांगली कंबर कसली होती. मात्र, तरीही गोव्यामध्ये शिवसेनेला काही कमाल दाखवता आलेली नाहीये. शिवसेनेचा दारुण पराभव झाला. एकही जागा त्यांना राखता आली नाही. उलट नन ऑफ दि अदर (NOTA) या पर्यायाला शिवसेनेपेक्षा अधिक मत मिळाल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

Web Title: Sanjay Raut Criticized Narendra Modi Through Rokhthok On Election Result In Goa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top