'डुकराशी कुस्ती' फडणवीसांच्या इंग्रजी वाक्यावर राऊतांचा मराठी बाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political

इंग्रजी वाक्यावरून राऊतांनी मराठी बाणा दाखवत हा टोला लगावला आहे.

'डुकराशी कुस्ती' फडणवीसांच्या इंग्रजी वाक्यावर राऊतांचा मराठी बाणा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मागील काही दिवस राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सातत्याने पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीर यांचा अंडरवर्ल्डशी (Underworld) संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान फडणवीसांनी मलिकांच्या या आरोपांनंतर एक सूचक ट्वीट केलं होतं. कोणाचही नाव न घेता, 'आजच्या दिवसाचा विचार' असं म्हणत त्यांनी जॉर्ज बनार्ड शॉ यांचा कोट ट्वीट केला आहे. "डुकराशी कुस्ती खेळू नये, हे मी आधीच शिकलो आहे. तुमच्या अंगाला घाण लागते, पण डुकराला ते आवडतं" असा कोट त्यांनी केला होता, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

हेही वाचा: शस्त्र घेऊन WhatsApp Status टाकणाऱ्याला 'खाकी'चा दणका

दरम्यान, आता या युद्धात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. ट्वीटद्वारे रामदास फुटाणे यांच्या वात्रटिका शेअर करत, नाव न घेता राऊतांनी फडणवींसावर निशाणा साधला आहे. हे ट्वीट असे, चिखल, चिखलात लोळण्याचा कार्यक्रम वक्तशीर झाला. 'बर्नार्ड शॉ' वाचण्यासाठी दोघांनाही उशीर झाला. - रामदास फुटाणे, असे ट्वीट त्यांनी केले आहे. आता या ट्वीटमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राऊतांच्या या टीकेला फडणवीस काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्रजी वाक्यावरून राऊतांनी मराठी बाणा दाखवत हा टोला लगावला आहे. आम्ही कुसुमाग्रजांना वाचतो. बर्नाड शॉचा दाखला फडणवीसांनी दिला आहे. या निमित्ताने लोक वाचायला लागले आहेत. यंदाचे साहित्य संमेलन बहारदार होईल. चिखलफेक कोण करतंय हे जनतेलाही माहिती आहे, असेही ते म्हणाले आहेत.

loading image
go to top