Sanjay Raut I सोमय्यांच्या अडचणीत वाढ? INS विक्रांतचे पैसे गेले कुठे, राऊतांचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

'आयएनएस विक्रांत भंगारात विकण्याची तयारी भाजपाने केलीये'

सोमय्यांनी १०० कोटींचा हिशेब द्यावा, संजय राऊत संतापले

आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेला निधीच्या घोटाळ्याचा मुद्दा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बाहेर काढला आहे. आयएनएस विक्रांत भंगारात विकण्याची तयारी भाजपाने केली असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. विक्रांतसाठी गोळा केलेल्या निधीच्या घोटाळ्या संदर्भात त्यांनी भाजपाचे किरीटी सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेले पैसे जमा झालेले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

यावेळी ते म्हणाले, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीचा घोटाळा गोळा केलेला निधी निवडणुकीसाठी वापरला काय याचे उत्तर भाजपला द्यावाच लागेल. राजभवनाने आरटीआय अंतर्गत दिलेल्या माहितीवर संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे. घोटाळा 57 कोटींचा नाही तर शंभर कोटींपेक्षा जास्त रकमेचा आहे असेही ते म्हणाले आहेत.

सोमय्या या भ्रष्टाचाराचे मुख्य सूत्रधार आहेत. हा गुन्हा घडला महाराष्ट्र सरकारच्या हद्दीत घडला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकार कारवाई करणार असेही ते म्हणाले आहेत. सोमय्या हे सीए असल्यामुळे अंगी कसा जिरवायचा हे त्यांना माहीत आहे, राजभवनात दिलेल्या पत्रा पेक्षा दुसरा कोणता मोठा पुरावा असू शकतो असेही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: हिजाब वादात अल कायदाची उडी, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याकडून मुस्कान खानचं कौतुक

यावेळी ते म्हणाले, केंद्रीय यंत्रणा पारदर्शक किंवा निष्पक्ष असतील तर त्यांनी या विक्रांतच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी हिम्मत दाखवावी. भाजपचे पदाधिकारी असलेले ईडी यांनी ही चौकशी करावी. या भ्रष्टाचाराचे आणि कटाचे सूत्रधार सोमय्याच आहेत. भाजपला यासंदर्भातील घोटाळ्याचं उत्तर द्यावं लागेल. हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा असून राष्ट्रीय भावनेशी खेळ आहे. या सरकारला राष्ट्रीय भावना नाहीत, असेही ते म्हणाले आहेत.

या घोटाळ्यासंदर्भात त्यांनी आरटीआय कार्यकर्त्याकडून मागवलेल्या माहितीतून ही बाबा उघड झाली आहे. त्यामुळे आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेले पैसे हे राज्यपाल कार्यालयात पोहोचलेले नाहीत. विक्रांतला हवे असलेले २०० कोटी रुपये गोळा करून राज भवनात जमा करु असेही किरीट सोमय्या म्हणाले होते. यावेळी विक्रांतसाठी लोकांनी पाच पाच हजार रुपये टाकले. या काम करणाऱ्या १० अधिकाऱ्यांनी ५० हजार गोळा केले होते. नेव्हीनगरला अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले. त्यावेळी याअंतर्गत ५७ कोटी रुपये गोळा झाले होते. अनेक उद्योगपतींकडून पैसे गोळा करण्यात आले होते. ही केस सरळ ईडी, सीबीआयची आहे. हे पैसे जर राज्यापला कार्यालयात नाही पोहचले तर सोमय्यांची कंपनी निकॉन इंफ्रामध्ये वापरण्यात आले का? हे पैसे कोणाच्या घशात गेले याची चौकशी व्हावी, अशी मागणीही राऊतांनी केली आहे.

हेही वाचा: Ukraine Russia War : आम्ही अस्वस्थ! स्वतंत्र चौकशी करा, UN मध्ये भारताची भूमिका

Web Title: Sanjay Raut Criticized On Kirit Somaiya On Ins Vikrant Of Rajbhavan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..