"संजय राऊतांवर कारवाईची गरज नव्हती"; मोदींच्या भेटीत चर्चा झाल्याचं पवारांकडून स्पष्ट

नवाब मलिकांवरील कारवाईवर कुठलीही चर्चा झाली नाही- शरद पवार
sharad pawar meets PM Modi
sharad pawar meets PM Modi

मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Goregaon Patra Chawl Scam) संजय राऊतांची अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता(ED Attaches Sanjay Raut Property) ईडीने जप्त केली. यावरून राजकिय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. दरम्यान आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली.यावेळी त्यांनी शिवसेना नेते राऊतांवरील कारवाईचा मुद्दा मांडला. संजय राऊतांवर (Sanjay Raut) कारवाई करण्याची गरजच काय होती असा सवाल त्यांनी यावेळी केला.

sharad pawar meets PM Modi
Sangli Crime News l बालविवाह प्रकरणी आटपाडीच्या 5 जणांना अटक

महाराष्ट्रात झालेल्या कारवाया संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, संजय राऊतांवर कारवाई करण्याची गरजच होती का असा सवाल उपस्थित करत नवाब मलिकांवरील कारवाईवर कुठलीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी १२ आमदारांच्या प्रश्नावर मोदी विचार करून योग्य निर्णय घेणार असल्याचीही माहिती दिली.

sharad pawar meets PM Modi
राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये ऑफलाईन सुरु होणार- उदय सामंत

राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपविरोधात उभी आहे. राष्ट्रवादी कधीच भाजप सोबत नव्हती.सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत . महाविकास आघाडी सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा येणार असल्याचेही ते म्हणाले. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही असे प्रत्यूत्तर सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्कव्यावर शरद पवार यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com