
राऊतांवरच्या कारवाईमुळे आम्ही आनंदी; शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक पोहोचलं आहे. सकाळी सात वाजल्यापासून राऊतांच्या घरामध्ये ईडीची चौकशी सुरू आहे. वातावरण तापलं असून घराबाहेर राऊत समर्थकांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. अशातच या कारवाईमुळे आम्हाला आनंद झाल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाकडून येत आहे. (Sanjay Shirsath on Sanjay Raut ED enquiry)
हेही वाचा: Sanjay Raut ED Live Updates: राऊतांचे वकील घरी दाखल; अटकेची शक्यता वाढली
शिंदे गटातले आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsath) यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले की, संजय राऊत हुशार नेते आहेत. त्यांना ईडी वगैरे कशाची भीती वाटत नाही. त्यांना आत्मविश्वास आहे की आम्ही जे करतो ते खरं आहे. जेव्हा एवढी मोठी धाड पडते, तेव्हा अटकेची शक्यता जास्त आहे. शिवसैनिक आज आनंदी झाला. ज्याच्यामुळे, ज्याच्या भोंग्यामुळे शिवसेना (Shivsena) फुटली, त्याच्यावर कारवाई झाली त्यामुळे आनंद आहे. हा काही लोकनेता नाही, तो प्रवक्ता होता. त्यामुळे त्याच्याविरोधात काही उठाव वगैरे होणार नाही. सूड कसला, जो जैसा करेगा वैसा भरेगा!
हेही वाचा: "ठाकरेंना दाखवायचंय की..."; राऊतांवरच्या ED कारवाईवर सेनेची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊतांनी (Sanjay Raut) चौकशी सुरू असतानाच एक ट्वीट केलंय. बाळासाहेबांची शपथ घेऊन मी सांगतो की, मी कोणताही घोटाळा केलेला नाही. काहीही झालं तरी मी शिवसेना सोडणार नाही, अशा आशयाचं हे ट्वीट होतं. त्याबद्दल बोलताना शिरसाट म्हणाले की, बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) शपथ घेऊ नको. तेवढा मोठा तो नाही. तो अधिकार फक्त आम्हाला आहे. आम्ही शिवसेनेसाठी ४० वर्षे राबलो आहे. नोकरी करता करता नेते होणं सोपं आहे. शिवसेना सोडू नको, एक दिवस उद्धव साहेब स्वतः त्याला हाकलतील. आम्ही पाहिलंय याच माणसाने शरद पवारांच्या नादी लागून शिवसेनेचं वाटोळं केलंय. आम्ही राष्ट्रवादीबरोबर जाऊ नका सांगत असताना या माणसाने तिकडे जाणं कसं बरोबर आहे हे सांगितलं होतं. आता ईडीची चौकशी सुरू आहे. यावेळी त्याच्या अटकेची शक्यता नाकारता येणार नाही.
Web Title: Sanjay Raut Ed Enquiry Shivsena Eknath Shinde Mla Sanjay Shirsath
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..