esakal | संजय राऊतांची वर्षाच्या पहिल्याच दिवशी सूचक पोस्ट; इशारा कोणाला?
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut Facebook post on New Year

संजय राऊतांनी आज एक फेसबुक पोस्ट केली आहे. काय आहे फेसबुक पोस्ट बघू...

संजय राऊतांची वर्षाच्या पहिल्याच दिवशी सूचक पोस्ट; इशारा कोणाला?

sakal_logo
By
टीम ईसकाळ

मुंबई : सत्तासमीकरणाचा तिढा सुटण्यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत नेहमीच ट्विटमुळे चर्चेत राहिले आहेत. पण आज ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांनी आज एक फेसबुक पोस्ट केली आहे. काय आहे फेसबुक पोस्ट बघू...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राऊत यांनी फेसबुक पोस्ट करत म्हणले आहे की, 'हमेशा ऐसे व्यक्ती को संभाल के रखिये, जिसने आपको ये तीन भेट दी हो. साथ, समय और समर्पण.' अशी पोस्ट त्यांनी आज फेसबुकवर केली आहे. राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना मंत्रिपद न दिल्याने नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

कोरेगाव भीमा : प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मानवंदना

राऊत यांच्या या फेसबुक पोस्टमुळे संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा वाढलाय का अशीही चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. राऊतांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अशी पोस्ट केल्याने राऊत नक्की नाराज आहे की नाही असा प्रश्न पडला आहे.