

sanjay raut
esakal
Shivsena Uddhav Thackeray: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे तब्बल दोन महिने संजय राऊत उपचार घेणार आहेत. स्वतः राऊत यांनीच शुक्रवारी एका पत्राद्वारे ही माहिती दिली.
संजय राऊत म्हणतात, माझ्या प्रकृतीमध्ये अचानक काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे माझ्यावर उपचार सुरु असून मी यातून लवकरच बाहेर पडेन. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीमध्ये वावरणे यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.