Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut visits MNS book exhibition : मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या पुस्तक प्रदर्शनाला रोज शेकडो नागरिक भेट देत आहेत. मात्र, आज या ठिकाणी चक्क ठाकरे गटाचे नेते संजय राऊत पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. त्यामुळे आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.