
'बृजभूषण अन् योगींबरोबर आम्हीपण जेवायला बसतो': राऊत
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. सोमय्या यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांचे कसाबशी संबंध आहेत असा आरोप सोमय्या यांनी केला होता त्यानंतर राऊतांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
(Sanjay Raut On Kirit Somaiya)
मनसे नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबतचा खासदार बृजभूषण यांचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर या फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती. यावर बोलताना ते म्हणाले की, "आम्हीपण खासदार आहोत, आम्हीपण बृजभूषण अन् योगींसोबत जेवायला बसतो, तुम्ही जरा अभ्यास करत जा." असा टोला त्यांनी राज ठाकरे आणि मनसे नेत्यांवर लावला आहे.
हेही वाचा: उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध; सोमय्यांचा गंभीर आरोप
तसेच संभाजी राजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर बोलताना "आम्ही त्यांच्या घराण्याचा मान राखणार आहोत. आम्ही त्यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिला आहे पण दोन्ही उमेदवार आमचे असतील." असं राऊत म्हणाले आहेत. दरम्यान सकाळी छत्रपती संभाजी राजे माध्यमांना बोलताना म्हणाले होते की, "माझी आणि मुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चा झाली आहे. ते छत्रपती घराण्याचा मान राखतील असा मला विश्वास आहे." असा विश्वास त्यांनी मुख्यमंत्र्यावर दाखवत आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
हेही वाचा: Petrol-Diesel Rate: तेल कंपन्यांकडून दिलासा; जाणून घ्या आजचे नवे दर
"किरीट सोमय्या हा भ्रष्ट माणूस आहे. त्याला मानहानीचा खटला दाखल केलाय तर त्याला दुसरं कामंच काय आहे? कितीचाही खटला दाखल करू द्या आम्हाला काय फरक पडत नाही." असं राऊत म्हणाले. "ज्याने देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी संबंधित विक्रांत घोटाळा केला तो काय मानहानी करणार? तो आरोपी आहे, जामीनावर सुटलाय तो, तोंडानेच बोलतोय की दुसऱ्या कोणत्या अवयवाने बोलतोय काय माहिती?" अशी बोचरी टीका राऊतांनी सोमय्या यांच्यावर केली आहे.
Web Title: Sanjay Raut On Raj Thackeray Brijbhushan Yogi Adityanath Kirit Somaiya
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..