ईदच्या मुहूर्तावर 'या' 2 राज्यांची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्त्यात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salary

ईदच्या मुहूर्तावर 'या' 2 राज्यांची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्त्यात वाढ

रायपूर : देशातील दोन राज्यातील सरकारने ईदच्या मुहूर्तावर आपल्या कर्मचाऱ्यांना एक भेट दिली आहे. रविवारी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारच्या या निर्णयाची घोषणा केली आहे.

तसेच, १ मे हा गुजरात राज्याचादेखील स्थापना दिवस आहे. हा दिवस गुजरातच्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी भेट घेऊन आला. यानिमित्ताने गुजरात सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. तसेच छत्तीसगड सरकारनेही सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कामगार दिन सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचा ठरला आहे. रमजान ईद हा सण एका दिवसावर आला असून कामगार दिनानिमित्ताने दोनही राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना ईदची भेट दिली आहे.

हेही वाचा: पंतप्रधान मोदी 3 दिवस युरोप दौऱ्यावर; युक्रेन प्रश्नावर करणार चर्चा

यासंदर्भात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, "कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आम्ही आज एक मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आम्ही घेत असून हे दर आजपासून म्हणजे १ मेपासून लागू होणार आहेत." अशी माहिती त्यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन दिली आहे. दरम्यान गुजरातने आपल्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा: राज्यात गेल्या दोन महिन्यांत उष्माघाताचे 25 बळी; 8 वर्षातील उच्चांक

महाराष्ट्र राज्यासोबतच १ मे रोजी गुजरातचाही स्थापना दिवस आहे. कामगार दिन आणि गुजरात दिनाचे औचित्य साधून आणि देशातील वाढत्या महागाईपासून थोडा दिलासा मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांना ही वाढ देण्यात आली आहे. दरम्यान छत्तीसगड आणि गुजरातने कामगारदिनानिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना ईदची भेट दिली आहे.

Web Title: Increase In Inflation Allowance Two State Ramjan Eid Gift

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top