Sanjay Raut on Thackeray Brothers Alliance
esakal
Sanjay Raut on Thackeray: गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंची युती होईल, अशी शक्यता आहे. अशातच उद्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसऱ्या मेळावा आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्याला ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होईल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यासंदर्भात आता खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं आहे.